Congress: 'काँग्रेसने कच्चथिवू बेट श्रीलंकेला दिले' भाजपच्या आरोपावर काँग्रेसचा पलटवार

श्रीलंकेच्या ताब्यातील कच्चथिवू बेटावरून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Sakshi Patil

श्रीलंकेच्या ताब्यातील कच्चथिवू बेटावरून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. श्रीलंकेला कच्चथिवू बेट देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस सरकारने 1974मध्ये कच्चथिवू बेट श्रीलंकेला सुपूर्द केल्याची माहिती के.

अण्णामलाई यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपच्या टीकेवर कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. आत्ताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे पूर्वी परराष्ट्र सचिव असताना 2015मध्ये आरटीआयमधून ही माहिती मिळाली. भारत आणि श्रीलंकेसोबत करार झाल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com