Nana Patole : पटोले-वडेट्टीवारांमुळे काँग्रेसच्या यादीला उशीर? नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमुळं काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांच्या घोषणेला उशीर होत असल्याची चर्चा सुरु झालीय
Published by :
shweta walge

नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमुळं काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांच्या घोषणेला उशीर होत असल्याची चर्चा सुरु झालीय. काँग्रेस हायकमांड नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पण दोघांचाही लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीत जाण्याचा विचार नाही. वडेट्टीवारांना मुलगी शिवानीसाठी उमेदवारी हवीय पण त्यांना स्वतःला दिल्लीत जायचं नाही. नाना पटोलेंनाही भंडारा गोंदियातून लढायचा विचार नाही. पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर मतदारसंघ असल्यानं दोन्ही जागांमुळं इतर तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते मर्यादित करून अडकवून ठेवू नका, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीत कार्यकर्त्यांशी चर्चेदरम्यान आवाहन केले. पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करा असेही ते म्हणाल्याने पटोले हे काँग्रेसचे उमेदवार राहणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे नानाच्या वक्तव्यावरून नविन कोणता उमेदवार असणार हे लवकरच कळेल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com