व्हिडिओ
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कंबर कसली
लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपची बैठक झाली आहे. त्याचबरोबर मनसेची देखील बैठक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
२०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता कंबर कसली आहे. ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात होणार, त्याचसोबत लोकसभेची जागा पुन्हा काबीज करण्यासाठी रणनीती देखील आखली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.