Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, लोकसभा उमेदवार रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याने आता काँग्रेससमोर पर्याय काय आणि रामटेकमध्ये काय होणार, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाविकास आघाडीमध्ये रामटेक हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. मात्र, जात प्रमाणपत्रामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com