Pune Metro Station : भोसरी मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद, नाशिकफाटा नामकरण करण्याची होतेय मागणी

भोसरी मेट्रो स्टेशनच्या नावावरून पुण्यामध्ये नवा वाद निर्माण, नाव न बदल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

भोसरी मेट्रो स्टेशनच्या नावावरून आता नवा वाद पुण्यामध्ये निर्माण झाला आहे. भोसरी नाव बदलून नाशिकफाटा नामकरण करण्याची मागणी केली गेली आहे. तर नाव न बदल्यास आंदोलनाचा ईशारा देखील देण्यात आला आहे.

कासारवाडी ते नाशिकफाटा मेट्रो स्टेशनचं नाव चुकून भोसरी असं देण्यात आलं आहे. मेट्रो स्टेशनपासून भोसरी उपनगर पाच किलोमीटर दूर आहे. तर या नावामुळे प्रवाशांचा गोंधळ होत आहे. तरी, मेट्रो व्यवस्थापनाने भोसरी हे नाव बदलुन नाशिकफाटा असे नामकरण करावे, अशी मागणी रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com