Pune: पुणे महापालिकेत कोविड घोटाळा

पुणे महापालिकेत कोविड घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. माजी आरोग्य प्रमुख भारतींच्या काळात 90 लाखांचा घोटाळा झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे महापालिकेत कोविड घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. माजी आरोग्य प्रमुख भारतींच्या काळात 90 लाखांचा घोटाळा झाला आहे. कोविड टेस्ट किटसह औषधे खासगी रुग्णालयाल विकली. घोटाळ्याप्रकरणी आशिष भारतींसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा सूर्यकांत तारडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे मानपाच्या माजी आरोग्य प्रमुख आशिष भारती यांने कोविड काळात 90 लाख रुपयांचा घोटाळा केला. डॉ. आशिष भारती यांनी डॉ. अरुण सूर्यकांत तरडे आणि डॉ. सूर्यकांत हनुमंत गार्डी या दोघांना संगणमत करून 2021 मध्ये कैलासवासी आनंद बारटक्के हॉस्पिटल वारजे मध्ये पुरविण्यात येणाऱ्या कोविड टेस्ट सेने टायझर आणि इतर औषधे विकली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com