विकेंडमुळे लोणावळ्यातील भुशी धरण गर्दीने फुलले!

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं आहे
Published by :
Team Lokshahi

लोणावळा: भुशी डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी केली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं आहे. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहत आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान असलेलं भुशी धरण तुडूंब भरलं. पायऱ्यावरुन ओसंडून वाहणारं धरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.

विकेंड असल्याने आज लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी झाली आहे. लोणावळ्यात काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी पर्यटकांची गर्दी मात्र कमी झालेली नाही आहे. कुटुंबीय आणि मित्र मंडळींना सोबत घेत पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटत आहेत. पावसाचा जोर ओसरल्यामुळे ही गर्दी बघायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com