Dada Bhuse On Sudhakar Badguzar: सुधाकर बडगुजर हा छोटा मासा : दादा भुसे

सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्तासोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी विधानसभेत केला आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी सुधाकर बडगुजर पोलीस मुख्यालयात हजर झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्तासोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी विधानसभेत केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एसआयटीची घोषणा केली आहे. यावर दादा भुसेंनी मोठा दावा केला आहे. नाशिकमध्ये देशद्रोही आरोपी सलीम कुत्तासोबत डान्स करणाऱ्या सुधाकर बडगुजर हा छोटा मासा आहे. त्यांना फंडिंग कुणाचे होते? याची माहिती एसआयटी चौकशी मधून समोर आली पाहिजे, अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com