Lalit Patil Drug Case : ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची शक्यता

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. पुणे गुन्हे शाखेकडून डॉ. संजीव ठाकूर यांची 3 वेळा चौकशी करण्यात आली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ड्रग्ज माफीया या ललित पाटील प्रकरणात डॉक्टर संजीव ठाकूर यांना अटक करण्याची मागणी कसब्याचे आमदार धंगेकर यांनी अनेकदा केली आहे. ललित पाटीलसह पुणे पोलिसांनी त्याच्या इतर साथीदार मोका अंतर्गत कारवाई केली असून आता या गुन्ह्यांमध्ये थेट डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com