Pandharpur : पंढरपुरातील खासगी रुग्णालयात भाविकांसाठी राखीव बेड ठेवण्याचा निर्णय

आषाढी यात्रेसाठी साठी सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आषाढी यात्रेच्या निमित्ताने यंदा‌ प्रथमच पंढरपुरातील खासगी रूग्णालयातील काही बेड भाविकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांनी आज दिली आहे. आषाढी यात्रेसाठी साठी सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.

आषाढी यात्रा नियोजनासाठी आज स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. आषाढी यात्रेसाठी साठी सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. गत वर्षीप्रमाणे यंदाही 3‌ ठिकाणी महा आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. शिवाय भाविकांच्या सेवेसाठी खासगी रूग्णालयातील काही बेड आरक्षीत ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com