Deepak Kesarkar on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर दिपक केसरकरांची प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी व्हावी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आता मागणी केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पंकजा मुंडे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी व्हावी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आता मागणी केली आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशी करावी. चुकीच्या गुन्ह्यामध्ये माझं नाव जोडलं जात आहे असे सोनावणे म्हणतात. महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर आता सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप केले जात असून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहे. गुन्हा दाखल झाला असेल तर चौकशी करा जर चूक असेल तर चूकच आहे. कोणत्याही विषयाशी माझे नाव घेण्यात चुकीच आहे. वाळू माफिया मटका किंग कोण आहेत? असा सवाल देखील सोनवणे यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाने यात पुढाकार घेऊन चौकशी करावी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोनावणे यांनी केली आहे. तर जिल्ह्यात केवळ भावनिक राजकारण केलं जात आहे. 10 वर्षात कोणताही विकास केला नाही असा थेट आरोप सोनावणे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com