Dehu Palkhi : हरिनामाच्या गजरात दुमदुमली देहूनगरी, तुकोबांच्या पालखीला आकर्षक सजावट

संत तुकोबांची पालखी देहूतुन आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. देहूकरांचा निरोप घेतल्यानतंर ही पालखी रथात विराजमान होऊन पुढे मार्गस्थ होत आहे.
Published by :
Team Lokshahi

संत तुकोबांची पालखी देहूतुन आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. देहूकरांचा निरोप घेतल्यानतंर ही पालखी रथात विराजमान होऊन पुढे मार्गस्थ होत आहे. त्यासाठी या पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. हा पालखी रथ देहूच्या मुख्य मंदिरातुन अनगडशाहादर्गा या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे. हा रथ बाहेर काढताना वारकऱ्यांचा हरी नामाचा जयघोष देखील पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com