Electric Bus : इलेक्ट्रिक बेस्ट बसचा पुरवठा करण्यास विलंब; आतापर्यंत केवळ 185 बसचा पुरवठा

इलेक्ट्रिक बेस्ट बसचा पुरवठा करण्यास विलंब होताना दिसत आहे. आतापर्यंत 2100 बसेस पैकी केवळ 185 बसचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

इलेक्ट्रिक बेस्ट बसचा पुरवठा करण्यास विलंब होताना दिसत आहे. आतापर्यंत 2100 बसेस पैकी केवळ 185 बसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2023 ची मेगा इंजिनिअरिंगला डेडलाईन दिली होती. ती टळल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऑगस्ट 2024 मध्ये याला एक वर्ष पूर्ण होईल.

निवडणूक रोखे खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘मेघा इंजिनियरिंग’च्या उपकंपनीने ‘बेस्ट’ला 2100 पैकी केवळ 182 बसचाच पुरवठा केल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट 2023 मध्ये सर्व बस ताफ्यात येणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ 10 टक्केच पुरवठा होऊ शकला आहे. कच्चा माल वेळेवर मिळत नसल्याचं कारण कंपनीने दिले असून याबाबत नोटीस पाठविण्यात आल्याचे बेस्टने स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com