Nana Patole यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी?

नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नवी कमिटी स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 17 डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी साधणार संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावरही चर्चा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com