Walmik Karad ला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप; CCTV फुटेज दाखवा देशमुख कुटुंबाची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप, देशमुख कुटुंबाची CCTV फुटेजची मागणी.
Published by :
shweta walge

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता याच आरोपाबाबत देशमुख कुटुंबाकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार असून सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी केली जातेय. कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलंय.याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com