Beed: सरपंच हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय SIT अधिकाऱ्यांची भेट घेणार
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी गेले काही दिवस ठिकठिकाणाहून संताप व्यक्त केला जातो आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी CID ची भेट घेऊन शासकीय विश्रामगृहात चर्चा केली आहे. दरम्यान आज SIT ची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज SIT अधिकाऱ्यांना भेटून देशमुखांचे कुटुंबिय पुन्हा तपासाची माहिती घेणार आहेत. दरम्यान सरपंच हत्याप्रकरणी मस्साजोग मधील ग्रामस्थांनी केलेलं आंदोलन स्थगित केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख म्हणाले, सगळ्या गोष्टी तशाच आहेत, तेच मुद्दे आहेत आणि आमचा प्रमुख मुद्दा आहे. पहिल्या 4-8 दिवसातला तपास तुमच्याकडे आला आहे का? ते आज येतील आम्हाला बोलवतील, याच पद्धतीने आम्ही येऊ... पहिल्या दिवसापासून मी हेच सांगतो आहे. आम्ही त्यांच्यावर विश्वास दिला आहे. तपास योग्य रीतीने चालू आहे. त्यानींही आम्हाला विश्वास दिला आहे की, तपास योग्यरीतीने चालू आहे जे आरोपी आहेत, जे काटकारस्थान करत आहेत, त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्याच गोष्टीवर आम्ही पुढे चाललो आहोत.