व्हिडिओ
देवेंद्र फडणवीस विधानसभा, तर एकनाथ शिंदे यांची विधान परिषद सभागृह नेतेपदी निवड
विधानसभा सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. तर विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडसुद्धा होणार आहे. विधानसभा सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. तर विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.