व्हिडिओ
देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला, 10 जागांच्या तिढ्याबाबत चर्चा?
भाजपची पहिली यादी येण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
भाजपची पहिली यादी येण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर आज दिल्लीहून आल्यानंतर विमानतळावरून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्यांदी संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले असल्यास सांगितले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. मात्र या भेटीत कशावर चर्चा होणार यावर सर्वांच लक्ष आहे.