व्हिडिओ
राहुल गांधींच्या 'त्या' विधानाला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, आधी त्यांनी...
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विधानावर फडणवीसांचे प्रत्युतर
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात आमचे सरकार आल्यावर आम्ही जातीवर आधारित जनगणना करू, असे विधान केले होते. या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, मग मी उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.