…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; फडणवीसांचे मोठे विधान

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी एसआयटीतर्फे चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नुसत्या विधानावर कारवाई केली जात नाही. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com