Narendra Maharaj Bhakt Protest : विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याविरोधात नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक
मुंबई, पुणे आणि संभाजीनगर मध्ये वडेट्टीवारांविरोधात नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक झाले असून नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु श्रीनरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होत.
यादरम्यान "श्री स्वरूप संप्रदायाच्या" वतीने अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निषेध आंदोलन केलं जात आहे. तसेच त्या वादग्रस्त विधानाचे पडसाद मुंबई, पुणे आणि संभाजीनगर मध्ये आंदोलनाच्या स्वरुपात पाहायला मिळत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजे भक्त आंदोलन करत आहेत.
आंदोलनाच्या वेळी विजय वडेंटीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून केले तसेच आंदोलन विजय विडेंटीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज या वक्तव्याविरोधात स्वता पोलिसात तक्रार देणार आहेत. त्यांचे राज्यभरातले समर्थक आता आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे.