Dhananjay Munde: " मी राजीनामा दिलेला नाही"; मुंडेनी फेटाळल्या राजीनाम्याच्या चर्चा

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाही, चर्चांना फेटाळलं. बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर कारवाईमुळे राजीनाम्याच्या मागण्या वाढल्या.
Published by :
Prachi Nate

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर अद्याप ही कोणता गुन्हा दाखल झालेला नाही मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच एकमेकांसोबत चांगले संबंध असल्यामुळे जी काही चौकशी या प्रकरणाबाबत सुरु आहे.

चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना पदावरून दूर ठेवा असं नेत्यांकडून मागण्या केल्या जात आहेत. मित्रपक्ष भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील अशी मागणी केली होती की त्यांनी राजीनामा द्यावा. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागण्या केल्या जात आहेत मगं ते विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्यांच्या मित्रपक्षातील नेते देखील राजीनाम्याची मागणी करत आहेत.

राजीनामा दिला नाही, चर्चांना फेटाळले

धनंजय मुंडे हे सध्या मंत्री आहेत आणि त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे वाल्मिक कराड हे सध्या जेलमध्ये आहेत. असं सगळं सुरु असताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. तर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यादरम्यान ते राजीनामा देणार नाही असं त्यांनी सांगितल होत. " मी राजीनामा दिलेला नाही" असं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com