अमित शाह यांनी केलेल्या शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह यांनी म्हटले की, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख आहेत. देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, अमित शाह साहेब बोलल्यानंतर त्याचे मी उत्तर देणं योग्य वाटत नाही. काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत. असे धनंजय मुंडे म्हणाले. असे धनंजय मुंडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com