व्हिडिओ
Pandharpur News: पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरु; उपोषणकर्त्यांचा सरकारला इशारा
पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण आंदोलन सुरु आहे. माऊली हळणवर, दीपक बोराडे ,विजय तमनर, गणेश केसकर ,योगेश धरम आणि यशवंत गायके हे सहा धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.