कोल्हापुरात सकल धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी आज धनगर बांधवांनी मुंडन आंदोलन केलं आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने आंदोलन केलं आहे तसेच टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे आंदोलकांनी म्हंटल आहे.