Dharashiv : कळंबच्या तीन मित्रांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यावर साधली किमया

लहानपणापासून एकमेकांचे बालमित्र असलेले तीन मित्र आजही वयाच्या पन्नाशीत एकमेकांना अडीअडचणी आणि सुखदुःखात आधार देत आहेत. यातूनच त्यांनी गजानन डेअरी फार्म नावाचा हाय टेक दुग्ध व्यवसाय उभा केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

धाराशिव: मैत्रीचं रुपांतर नात्यात झालेलं आपण अनेकदा बघितलं असेल. याचंच एक उदाहरण धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे. संदीप उर्फ भैय्या बाविकर, बाळासाहेब धस आणि शंकर माने हे लहानपणापासून एकमेकांचे बालमित्र असलेले तीन मित्र आजही वयाच्या पन्नाशीत एकमेकांना अडीअडचणीत आणि सुखदुःखात आधार देत आहेत. आज याच मित्रांच्या मैत्रीतून गजानन डेअरी फार्म नावाचा हायटेक दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com