Dharavi Vidhan Sabha Update :धारावीत बंडखोरी टळली, अपक्ष उमेदवार बाबुराव माने यांची माघार

धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी टळली, बाबुराव माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Published by :
shweta walge

धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी टळली आहे. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड धारावीतून उमेदवार असून ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाच्या सूचनेनुसार बाबुराव मानेंनी धारावीतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com