Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात मतदान काल पार पडले.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात मतदान काल पार पडले. मुंबईतल्या मतदानसंघापैकी सर्वात कमी मतदान दक्षिण मुंबईत झालं. दक्षिण मुंबईत सरासरी 47.70 टक्के इतकं मतदान झालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांना खरच मदत झाली की नाही असे तर्क वितर्क लावले जात आहेत.

तुम्हाला आणि विरोधकांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही 4 तारखेला मिळतील. यामिनी जाधव यांना कुलाब्यातून 2019 मध्ये एनडीएच्या उमेदवाराला जेवढं मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य कुलाबा विधानसभेतून मिळेल आणि यातून तुम्हाला या सर्वाची उत्तरं मिळतील. निकालानंतर आपल्याला दिसेल की कुलाबा विधानसभा मतदारसंघातून एनडीएच्या उमेदवारला गेल्यावेळीपेक्षा अधिक मताधिक्य मिळालेलं दिसेल. कमी मतदान झालेलं असेल तरी असे राहुल नार्वेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com