Amravati: अमरावतीतील ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

अमरावतीतील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अद्यापही सादर न केल्याने अपात्रतेची शक्यता आहे.

अमरावतीतील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अद्यापही सादर न केल्याने अपात्रतेची शक्यता आहे. निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने कारवाईची शक्यता वर्तवली जाते आहे. जातवैधता सादर न केल्यानेही अनेक सदस्य अपात्र होणार आहेत. 18 जानेवारी 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला होता. त्याला दोन वर्ष उलटलेली आहेत तरी सुद्धा अजूनही निवडूण आलेले सदस्य त्यांनी कागदपत्र सादर केलेली नाही आहेत. त्या बरोबर जो खर्च केला होता तेही सादर केलेला नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com