Sushma andhare: डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका? सुषमा अंधारेंचं ट्विट

डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका.त्याचं बरोबर पोर्शे कार आणि आरोग्यखात्याबाबत खुलासे निकाला नंतर करेन असं सुषमा अंधारेंनी ट्विट मधून म्हटलं आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे अपघात प्रकरणात सुष्मा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये सुष्मा अंधारे म्हणाल्या की, डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका असल्याचं सुषमा अंधारेंनी ट्विटमधून म्हटलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांनी ट्विट केलं आहे. तर पोर्शे कार आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन असं देखील सुषमा अंधारे यांनी ट्विट मध्ये म्हटंल आहे. पण तोवर डॉ.अजय तावरेच्या जीवितेच्या सुरक्षतेची काळजी नक्कीचं वाटते असं सुषमा अंधारे यांनी ट्विट मध्ये म्हटंल आहे.

त्याच बरोबर, ४ जूननंतर म्हणजे निकालानंतर माझ्याकडे जी काय माहिती आहे, त्याच्यावर मी भाष्य करेन, आता माझ्या साठी डॉ.अजय तावरे सुरक्षता महत्वाची आहे.अजय तावरे जेव्हापासून ससूनमध्ये आहेत तेव्हापासून अनेक वीआयपी रूग्णकैदी अजय तावरेच्या देखरेखी खाली होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत अशी प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांनी स्वत:च्या ट्विट वर दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com