Panvel : मंगला एक्सप्रेसमध्ये ड्रग्सची तस्करी; पनवेलमधून 36 कोटींचे अमली पदार्थ जप्त

मंगला एक्सप्रेसमध्ये अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली.
Published by :
Team Lokshahi

( Panvel) मंगला एक्सप्रेसमध्ये अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली. पनवेलमधून 36 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईल एका नायजेरियन महिलेला ताब्यात घेतलं आहे. तपासणी दरम्यान महिलेच्या बॅगेतून 2 किलो कोकेन सापडल्याची माहिती मिळत आहे. ही संयुक्त कारवाई रेल्वे सुरक्षा दल (RPF) पनवेल, अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) बेंगळुरू, आणि क्राईम इंटेलिजन्स ब्रँच (CIB) कुर्ला, मुंबई यांनी केली.

मंगला एक्सप्रेस पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर दाखल होताच संबंधित पथकाने संशयित महिलेचा शोध घेतला.तिने आपली ओळख एतुमुडॉन डोरिस अशी सांगितली.तिच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये लपवून ठेवलेले अमली पदार्थ सापडले. या अमली पदार्थांचे एकूण बाजारमूल्य अंदाजे 36 कोटी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.महिलेला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com