Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा फोनवरून मुख्यमंत्र्यांसोबत भावनिक संवाद

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोनवरील संभाषणाचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोनवरील संभाषणाचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना फोन केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वेळेवर एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल आभार मानले आहेत. खडसे म्हणाले आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी जळगावमधील निवासस्थानी खडसेंना हृदयविकाराचा झटका आला होता आणि यावेळी तात्काळ मुंबईला आणणे गरजेचे होते. तेव्हा मुख्य्मंत्र्यांनी तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com