Eknath Maharaj Palkhi : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण संपन्न

हरी नामाचा जयघोष करत हातात भगव्या पताका घेत हजारो वारकरी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण पार पाडताना उपस्थित होते.
Published by :
Team Lokshahi

हाटकरवाडी या पंचक्रोशीत सकाळी दहा वाजता संत एकनाथ महाराज यांची पालखी दाखल झाली. हाटकरवाडीत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नाथभक्ताने जोरदार स्वागत केले. तसेच परिसरातील हजारो भाविकांची तेथे उपस्थिती दिसून आली होती

हरी नामाचा जयघोष करत हातात भगव्या पताका घेत हजारो वारकरी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण पार पाडताना उपस्थित होते. डोळ्याचा पारणा फेडणारा हा नयनरम्य सोहळा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा या ठिकाणी पार पडली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com