आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; एकनाथ शिंदे म्हणाले...

आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी केली टीका. सरडा रंग बदलतो, पण अशी जात पहिल्यांदा पाहिली, असे शिंदे म्हणाले.
Published by :
shweta walge

मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असे विधान केल्याने ठाकरेंचा फडणवीसांशी सलोखा वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र डांगलं आहे. देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणाऱ्यांनी लवकर रंग बदलला. सरडाही रंग बदलतो, पण अशी जात पहिल्यांदा पाहिली अस ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com