आता रडगाणं थांबवा, ईव्हीएमवरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर पलटवार

आता रडगाणं थांबवा, असं म्हणत ईव्हीएमवरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. हरले की ईव्हीएम घोटाळा, जिंकल्यावर घोटाळा नाही. लोकसभेत सर्वाधिक मतं मिळूनही आम्हाला कमी जागा आल्या होत्या. लोकसभा निकालानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. घरी बसणा-यांना लोकं मतदान करत नसल्याचा टोला शिंदे यांनी लगावला आहे. जनतेनं विरोधी पक्षाला जागा दाखवली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आता रडगाणं थांबवा, असं म्हणत ईव्हीएमवरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com