व्हिडिओ
Electricity Fare: नागरिकांसाठी आनंदाची बातमी; वीज दर होणार कमी; एप्रिलनंतर लागू होणार निर्णय
नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 1 एप्रिलनंतर वीज दर कमी होणार, 50 ते 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणकडून मांडला.
राज्यात वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे. 1 एप्रिलनंतर हा नियम लागू होणार आहे. तर 50 ते 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महावितरणकडून पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. ज्यात 50 तो 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियमक आयोगाकडे दिला आहे.
तसेच 200 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव देखील यावेळी मांडण्यात आला आहे. त्यामुळे महागाईत देखील सुखद धक्का महावितरणकडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महावितरणला पुढील 5 वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलांसाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो, त्यानुसार महावितरणने 2029 ते 2030 अशा पाच वर्षांसाठीच्या दरपुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे.