व्हिडिओ
Kolhapur : सकल मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचं डोकं फोड आंदोलन आज करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील जिल्हा दांडपट्टालाठी असोसिएशनच्यावतीने दसरा चौक परिसरात हलगीच्या तालावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करत, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक डोक्यावर वार केल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतले जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.