Pune : पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला, तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी

पुणे जिल्हयातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयाचे कुलुप अज्ञात व्यक्तींनी तोडून कार्यालयातून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या खोलीतून ईव्हीएम मशीनचे एक डेमो मशीन चोरी करुन नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे जिल्हयातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयाचे कुलुप अज्ञात व्यक्तींनी तोडून कार्यालयातून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या खोलीतून ईव्हीएम मशीनचे एक डेमो मशीन चोरी करुन नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीची घटना तहसीलदार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली असून त्याअधारे आरोपींची ओळख पटवून पुणे ग्रामीण पोलीसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. अगामी लोकसभा निवडणुक लवकरच होणार असून त्याअनुषंगाने प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या असून सोमवारी रात्री तीन अज्ञात चोरटयांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलुप कशाचेतरी सहाय्याने तोडून खोलीत प्रवेश केला. फरार झालेल्या तीन अज्ञात चोरटयांचा शोध पोलीस घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com