Graduate Election: शिक्षक, पदवीधर निवडणूक मतदान वेळेत वाढ

शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत आता वाढ करण्यात आली आहे. 26 जून रोजी शिक्षक, पदवीधरसाठी मतदान होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

भारत निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची वेळ जाहीर केली आहे. शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत आता वाढ करण्यात आली आहे. 26 जून रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत शिक्षक पदवीधरसाठी मतदान होणार आहे. मुंबई मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी उत्साहाने आणि मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी वेळेत करण्यात आली आहे.

यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी ४ अशी वेळ ठरवण्यात आली होती, मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ७ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com