Nashik : राज्यात 20 जणांकडे पॅथॉलॉजीची ‘बोगस’ पदवी!

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडून 20 विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २० विद्यार्थ्यांनी बीएस्सी एमएलडी, डीएमएलटी या बनावट पदव्या घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

नाशिक: नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडून 20 विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २० विद्यार्थ्यांनी बीएस्सी एमएलडी, डीएमएलटी या बनावट पदव्या घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पॅरावैद्यक परिषदेने त्यांच्याकडे आलेली कागदपत्रे नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठविली होती. पडताळणीअंती ती कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक तालुका पोलिसांत बनावट कागदपत्रे व पदवी देणाऱ्या राज्यातील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com