व्हिडिओ
तुम्ही बनावट पनीर तर खात नाही आहात ना? नाशिकमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त
ऐन सणासुदीच्या काळामध्ये नाशिकमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे.
ऐन सणासुदीच्या काळामध्ये नाशिकमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सर्च मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली.
बनावट पनीर जप्त करुन नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नाशिकच्या अंबड येथील साई एंटरप्रायजेस या कारखान्यावर छापा टाकण्यात आला असून या कारवाईमध्ये 47 हजार रुपये किंमतीचं 239 किलो पनीर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.