बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अकोल्यात शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत.
Published by :
Team Lokshahi

अकोल्यात शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत. तरी सुद्धा कापसाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. यंदा उत्पादन निष्फळ झाल्याने पुरवठा कमी होत असल्याचं स्पष्टीकरण दुकानदार देत आहे. मात्र बियाण मिळत नसल्याने शेतकरांच्या संयमाचा बांध फुटला. शेतकरी रात्रीपासून विविध दुकानासमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाण न मिळाल्याने सुमारे 12 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जास्त दराने सुद्धा बियाणं विकल्या जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com