Yavatmal: यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धरले धारेवर

यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहेत; ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी खडेबोल सुनावले. शेतमालाला भाव का मिळत नाही? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
Published by :
Team Lokshahi

यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहेत; ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी खडेबोल सुनावले. शेतमालाला भाव का मिळत नाही? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी विचारला आहे.

'घर चलो अभियान' भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे महागाव या गावात दौऱ्यावर आले असताना, शेतमालाला भाव नसल्याचे सांगत त्यांना शेतकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत. शेतमालाला भाव का मिळत नाही? कोरोना काळात सर्व उद्योग बंद होते, मात्र शेती हा व्यवसाय सुरू होता. तुम्ही एकीकडे म्हणतात जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि दुसरी कडे शेतमालाला भाव मिळत नाही. वरिष्ठांपर्यंत आमच्या मागण्या का सांगत नाहीत? चालायला रस्ता नाही, सिंचनासाठी लाईट मिळत नाही, अशाने शेतकरी वर्ग कसा जगेल? अशा प्रकारे प्रश्नांची सरबत्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवण्यात येईल असे आश्वासन अहिर यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com