Solapur : ध्वजारोहणानंतर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच शेतकरी तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Published by  :
Team Lokshahi

सोलापुर: स्वातंत्र्यदिनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नव्या महसूल भावना समोर शासकीय ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणा नंतर लगेच त्यांचे भाषण सुरू असताना एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर भारत पाटील असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो राहणार दोडी तालुका दक्षिण सोलापूरचा आहे. त्याने लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करून देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com