Thane : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त, 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत

म्हाडा कोकण कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कोकणातील 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारी रोजी सोडत निघणार आहे.

म्हाडा कोकण कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कोकणातील 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारी रोजी सोडत निघणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. आधी ही सोडत नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार होती, पण कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे कोकण मंडळाने जाहीर केले होते. मात्र 13 नोव्हेंबरच्या सोडतीला काही दिवस शिल्लक असतानाच प्रशासकीय कारण देत तीही पुढे ढकलण्यात आली होती. आता ती 24 फेब्रुवारीला निघणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com