दादरमधील महापालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 16 ते 17 वाहने जळून खाक

दादर पश्चिम येथील बीएमसीच्या कोहिनूर पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री अचानक आग लागली.

मुंबई : दादर पश्चिम येथील बीएमसीच्या कोहिनूर पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com