धक्कादायक! जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं?

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडलीय.
Published by  :
Team Lokshahi

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडलीय. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलनंच गोळीबार केला असून त्याला ताब्यात घेतलय. मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. तर टीकाराम असं मृत्यू झालेल्या आरपीएफच्या अधिका-याचं नाव आहे. ही ट्रेन राजस्थानमधून पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलंय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com