Shambhuraj Desai: ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

सकृत दर्शन तर असं दिसतय की तिथे दोनच व्यक्ती होते. अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घातल्या आणि दुसऱ्या व्यक्तीने स्वतःला गोळ्या घातल्या.
Published by :
Team Lokshahi

सकृत दर्शन तर असं दिसतय की तिथे दोनच व्यक्ती होते. अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घातल्या आणि दुसऱ्या व्यक्तीने स्वतःला गोळ्या घातल्या. असं असताना समजा माननीय उद्धव ठाकरेंकडे इनपुट असेल, की तिसरी व्यक्ती तिथे कोण होती का? कोणी कोणाला सुपारी दिली होती का? तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं की माझ्याकडी ही माहिती आहे, या दृष्टीने चौकशी करा. कारण आधीच या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल समोर येऊ द्या. कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. पोलिस दलात कार्यक्षम अधिकारी आहेत. अनेक ठिकाणी गुंडांची परेड काढली जात आहे असं शंभूराज देसाई म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com