Talathi Recruitment: तलाठी भरतीची पहिली गुणवत्ता यादी वादात

राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली.
Published by :
Team Lokshahi

राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेत नापास होतो. परंतु, तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो. तसेच काही परीक्षार्थींना 200 गुणाच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहत आहे असे आमदार सत्यजीत तांबेंनी सांगितले आहेत. सरकारी नोकरीच्या भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात. मात्र, तरीही घोटाळे काही केल्या थांबेना. परीक्षांमध्ये पेपर फुटी, गुणांची अदलाबदल करणे, याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे अशी मागणी सत्यजीत तांबेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com