सांगलीत ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

सांगलीमधून चंद्रहार पाटलांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाकरे गटाकडून सांगली मधून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. सांगलीमधून चंद्रहार पाटलांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रहार पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले की, सुरुवातीला मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, संजय राऊतांचे आणि शिवसेना पक्षाचे आभार मानतो. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानतो. कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर जो लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या उमेदवारीची जो विश्वास दाखवला त्यामुळे महाविकास आघडीचे, शिवसेना पक्षाचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांची भूमिका मांडून सांगली जिल्हा काँग्रेसला मिळावा यासाठी त्यांनीही भूमिका घेतली होती. आम्हीही शिवसेना पक्षाला ही जागा मिळावी म्हणून ठाम भूमिका घेतली होती. आदरणीय उद्धव साहेबांनी ही घोषणा केली होती. पण आज अधिकृत घोषणा झाली पक्षामार्फत, महाविकास आघाडीमार्फत की महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील असतील त्यामुळे इथून पुढे सर्वजण आम्ही एकत्र काम करणार आहोत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com